India Pakistan War: भारतीय सैन्याने गुरुवारी रात्रभरात पाकिस्तानला रात्रभर मोठा दणका दिला आहे. थेट पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत धडक मारत जोरदार ड्रोन आणि हवाई हल्ले (Air Strike) केले.
त्यामुळे इस्लामाबादेत एकच हाहाकार माजलाय. कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरचीही भारतीय सैन्यांनी झोप उडवली…पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला…अनेक शहरांमध्ये ब्लॅक आऊट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली.
India Pakistan War : युद्धजन्य पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर
युद्धजन्य पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय सेवा अलर्ट मोडवर आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशननं आवाहन केलं आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय संस्थांना आवाहन करण्यात आलं आहे. तसेच, स्थानिक यंत्रणांसोबत समन्वय ठेवण्याचे आदेशही देण्यात आलेत. औषधे, खाटा आणि अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा ठेवा, असेही निर्देश दिले गेले आहेत. अधिकाधिक रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्ताचा साठा करा नागरिकांनी ही मदत करण्याचं आवाहन फेडरेशननं केलं आहे.
भारतीय लष्कराचं सीएफव्हींना सडेतोड उत्तर
Indian Army neutralized Pakistani Drones: भारतीय सैन्याने पाकिस्तानचे 50 ड्रोन्स निकाम केले
पाकिस्तानचा रात्रभर गोळीबार
पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये एलओसीवर रात्रभर जोरदार गोळीबार केला. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिलं. भारताने केलेल्या भडीमारात पाकिस्तानी चौक्या अक्षरशः भाजून निघाल्या. दक्षिण काश्मीरमधील पूंछ, राजौरी, सांबा सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानचा रात्रभर तोफांचा भडीमार सुरू होता. तो अजूनही सुरूच आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबारामुळे संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आलाय.
भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीत…आकाशानंतर समुद्रातूनही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं…
पाकिस्तानातल्या कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले…14 पेक्षा जास्त स्फोटांनी कराची बंदर हादरून गेलं…भारतीय नौदलाच्या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरात ब्लॅकआऊट केलं. १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं…
भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवलीय…भारतानं पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं गारद केलीयत. चीननं दिलेले पाकिस्तानचे दोन जेएफ १७ आणि अमेरिकेच्या एका एफ १६ विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला…भारतानं दोन विमानं पाडल्याची कबुली पाकिस्ताननंच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलीय…पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. एफ १६ विमानं अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेत. त्याचा दहशतवादी कारवायांसाठी वापर केल्यानं आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करणार ते पाहायचंय.
भारतानं जोरदार प्रत्युत्तर देऊनही नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक सुरूच आहे. त्यात सीमेवरच्या निष्पाप लोकांचा बळी गेलाय…पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी भारतीय लष्करानंही आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला…पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं जोरदार कारवाई केली. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर लक्ष्य करत भारतीय सैनिकांनी त्यांची पळता भुई थोडी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 09-05-2025














