India Pakistan War: भारत (India) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना (Drone And Missile Attacks From Pakistan) भारतीय लष्कराकडून (Indian Army) योग्य उत्तर दिलं जात आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakistan Pm Shehbaz Sharif) यांच्या घरापासून 20 किलोमीटर अंतरावर स्फोट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या घरापासून फक्त आणि फक्त 20 किलोमीटर अंतरावर मोठा स्फोट झाला. त्यानंतर तातडीनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बंकरमध्ये हलवण्यात आलं. कुरापतखोर पाकिस्तानचे पंतप्रधान घाबरुन बंकरमध्ये लपल्याची माहिती मिळत आहे.
यापूर्वी, प्रत्युत्तराच्या कारवाईत, भारतानं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण प्रणालीसह अनेक क्षेपणास्त्र नष्ट केली होती. भारतीय लष्करानं पाकिस्तानची हाय-टेक लढाऊ विमानं एफ-16 आणि जेएफ 17 पाडली आहेत.
जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतानं योग्य प्रत्युत्तर दिलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटलं आहे की, भारत स्वतःचं रक्षण करण्यास पूर्णपणे तयार आहे.
पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे हल्ले जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ करण्यात आले असल्याची माहिती मिळतेय. मात्र, भारतानं पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे.
गुरुवारी रात्री जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबच्या अनेक सीमावर्ती भागात पाकिस्ताननं केलेला हवाई हल्ला भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं यशस्वीरित्या उधळून लावला. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नामुळे जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक भागात ब्लॅकआउट झालं आणि सायरन वाजू लागले.
INS विक्रांतवरुन कराची बंदरावर हल्ले
एकीकडे भारतीय वायूदलानं आणि लष्करानं पाकिस्तानला उत्तर दिल्यानंतर दुसरीकडे भारतीय नौदल आता आक्रमणासाठी सज्ज झालं आहे. भारतीय नौदल अरबी समुद्रात सज्ज झालं असून पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे की, “दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारतासोबत काम करण्याच्या अमेरिकेच्या वचनबद्धतेचं मी मनापासून कौतुक करतो. दहशतवादाला प्रोत्साहन देण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिलं जाईल.”
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:23 09-05-2025














