लांजात गर्दीच्या ठिकाणी ‘मॉक ड्रिल’

लांजा : केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरी संरक्षण सज्जता बळकट करण्यासाठी मॉकड्रिल करण्याचे दिलेल्या आदेशानुसार लांजा पोलिस ठाणे हद्दीत कुठेही अफवा न पसरवता यशस्वी पार पडला.लांजा शहरातील चव्हाटा मंदिर परिसर, एसटी बस स्थानक, यासह आडवली रेल्वेस्टेशन या ठिकाण सायंकाळी ४ ते ६ वाजण्याच्या कालावधीत कुठेही अफवा न पसरता यशस्वीपणे मॉकड्रिल करण्यात आले.

मॉकड्रिलमध्ये पोलीस मित्र, व्यापारी, खाजगी शासकीय अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती, नगरपंचायत, राज्य परिवहन महामंडळचे कर्मचारी, होमगार्ड एनसीसी विध्यार्थी, शिक्षक यांचे सहकार्य घेण्यात आले.

यावेळी नाकाबंदी दरम्यानच प्रवासी व इतर नागरिकांना यावेळ कोणीही घाबरून जाऊ नये नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये शासनाकडून प्राप्त संदेशाचे अवलोकन करावे, सर्वांनी सुरक्षिततेच्यादृष्टीने आपल्या स्तरावर सुरक्षा उपाययोजन कराव्यात, व शासकी यंत्रणांना सहकार्य करावे याबाबत सविस्तः मार्गदर्शन करण्यात आले. मॉकड्रिल लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासः लांजा पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 09/May/2025