रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणाहून बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन जिल्हा पोलिसांनी केले आहे.
बेपत्ता व्यक्तींचा तपशील असा – कल्पना नरेश विश्वकर्मा (४० वर्षे) या गॅलेक्सी अर्पाटमेंट, उद्यमनगर रत्नागिरी येथून 19 जून 2024 पासून बेपत्ता आहेत. त्यांची उंची 5 फूट 5 इंच, रंग गोरा, बांधा मजबूत, डोळे काळे, गळ्यात मंगळसूत्र, नाकात सोन्याची फुली, नेसणीस साडी व ब्लाऊज सोबत पाच हजार रुपये, मोबाइल नाही.
फातिमा तय्यब मेमन (वय २३) या ४ ऑक्टोबर २०१५ रोजी पासून घर क्र. 786/1 शुक्राना अर्पाटमेंट, राजापूरकर कॉलनी, उद्यमनगर, रत्नागिरी येथून बेपत्ता आहे. त्यांची उंची ५ फूट ३ इंच, रंग सावळा, शरीरयष्टी सडपातळ, उजव्या हाताने आणि पायाने अपंग, अंगात पंजाबी ड्रेस, त्यावर काळा बुरखा, पायात पांढरी सँडल आहे.
अनिता सुदाम म्हस्के (३८ वर्षे) व मुलगा किमार अर्जुन म्हस्के (५ वर्षे) हे दोघे 15 जानेवारी 2017 पासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथून बेपत्ता आहेत. अनिता यांची उंची 5 फूट 1 इंच, डोळे काळे, केस काळे, रंग सावळा, चेहरा उभट, नेसणीस पिवळ्या रंगाची साडी व जांभळ्या रंगाचा ब्लाऊज व मुलगा किमारची उंची 3 फूट 4 इंच, रंग निमगोरा, चेहरा उभट, डोळे काळे, केस काळे, बारीक नेसणीस फिक्कट आकाशी रंगाचा बंद गळ्याचा टी शर्ट आहे.
या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 09-05-2025














