मुंबई : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कोकण किनारपट्टीवर देखील अलर्ट मोडवर दिसत आहे.
किनारपट्टी भागात गस्त वाढवण्यात आली आहे. रात्री पोलिसांकडून तपासणी करण्यात आली, तर अचानक नाकाबंदी देखील करण्यात आली होती.
तर रेडी बंदर, विजयदुर्ग बंदर ,मालवण बंदर, देवगड बंदर, निवती बंदर, आचरा बंदर, वेंगुर्ला बंदर, या सर्वच ठिकाणी सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सागर सुरक्षा सदस्यांना देखील सतर्क राहून संशयित बोटी दिसल्यास पोलिसांना कळविण्याचा आवाहन केले आहे.

सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सागरी सुरक्षादल वाढ केली असून अतिरिक्त पोलीस देखील तैनात करण्यात आले.

एखादी अनोळखी इसम किंवा संशयित वस्तू आढळल्यास 112 किंवा सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 09-05-2025














