Breaking : IPL 2025 स्पर्धा स्थगित ! भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

मुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने आयपीएल २०२५ तूर्तास स्थगित करण्याचा निर्यण घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरूवारचा पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे त्यानंतर आयपीएलचे सामने होणार की नाहीत असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा करून आयपीएल तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामना रद्द करण्यात आला होता. सुरक्षेच्या कारणांमुळे ब्लॅकआऊटची घोषणा करण्यात आली होती. प्रेक्षकांना तातडीने स्टेडियममधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे पुढील सामना होणार की नाही याबाबत साशंकता होती.

भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील धर्मशाला येथे खेळवला जाणारा सामना आधीच अहमदाबादला हलवण्यात आला होता. मात्र आता आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. आयपीएलचे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.

बीसीसीआयपुढे पुन्हा आयोजन करण्याचं आव्हान

आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक आणि खेळाडूंची उपलब्धता हे दोन्ही गोष्टींचा तालमेल बसवावा लागणार आहे. अजूनही 17 सामन्यांचा खेळ शिल्लक आहे. हे 17 सामने कसे आणि कुठे खेळवायचे याबाबत अजूनही काही स्पष्टता नाही. आतापर्यंत तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून आऊट झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आऊट झाले आहेत. मात्र उर्वरित सामन्यांमुळे प्लेऑफच्या गणितावर परिणाम होईल हे मात्र निश्तित आहे. तर प्लेऑफच्या शर्यतीत एकूण 7 संघ असून त्यांच्यात टॉप 4 साठी लढत सुरु आहे.

यापूर्वी 2021 मध्ये कोरोना काळात आयपीएल स्पर्धा स्थगित केली होती. कोरोना संकटात आयपीएल 2021 स्पर्धा दोन टप्प्यात खेळवण्यात आली होती. 4 मे 2021 रोजी आयपीएल स्पर्धा कोरोना रुग्ण वाढत असल्याने स्थगित केली होती. यानंतर आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये आयोजित केला होता. पहिल्या टप्प्यात 29 सामने, तर दुसऱ्या टप्प्यात 31 सामने झाले होते.

दरम्यान पुढच्या आयपीएल 2026 स्पर्धेत बीसीसीआय 74 ऐवजी 84 सामने करण्याचा विचार करत होते. पण या स्थितीमुळे सामन्यांची संख्या वाढवण्याचा तुर्तास थांबवावा लागेल. कारण करोना काळात आयपीएल 2021 मध्ये 4 मे 2021 रोजी स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर याच वर्षी सप्टेंबर महिन्याच्या मध्यात ही स्पर्धा सुरु केली होती. 31 सामने 19 सप्टेंबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 मध्ये खेळवले होते. या स्पर्धेचं जेतेपद चेन्नई सुपर किंग्सने मिळवलं होतं.

भारताने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकड्यांना चांगल्याच मिरच्या झोंबल्या आहेत. भारताने पाकिस्तानच्या एकाही लष्कराच्या तळाला धक्का न लावता दहशतवाद्यांचे तळ उडवून लावले होते. मात्र पाकिस्तानवाल्यांनी आपली लायकी दाखवली आणि भारताच्या सीमाभागांवर हल्ला केला. आपल्या लोकांवर हल्ला केल्यावर भारतीय लष्करानेही बाह्या सरसावल्या आणि पाकड्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, गुरूवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हा हल्ला परतावून लावला. या युद्धामुळे भारताने अंतर्गत खबरदारी घेतली असून सीमाभागांमध्ये ब्लॅकआऊट आणि देशातील २६ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम आयपीएलच्या सामन्यांवरही झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 09-05-2025