महाराष्ट्राच्या मानचिन्हांनी दापोली वनविभागाचे प्रवेशद्वार बनले लक्षवेधी

दापोली : आंबा, शेकरू, तामण, कबुतरांच्या प्रजातीमधील हरियाल अशी महाराष्ट्राची मानचिन्ह रेखाटलेले दापोली वनविभागाच्या मध्यवर्ती रोपवाटिकेचे नवे प्रवेशद्वार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. दापोलीत मध्यवर्ती ठिकाणी वनविभागाचे आठ हेक्टर इतके राखीव तन आहे यात रोपवाटिका वन वसाहत आहेत.

येथे खैर, सागवान, शिवण, बिवळा, ऐन, किंजल, किनई, सातवीन, अशा वृक्ष प्रजातींचे पंचरस नैसर्गिक जंगल आहे. या रोपवाटिकेचे प्रवेशद्वार पूर्णपणे जीर्ण झाले होते. आता वनपाल रामदास खोत यांच्या संकल्पनेतून चिपळूणचे घारे यांनी सुंदर महाराष्ट्राची मानचिन्हे या प्रवेशद्वारावर रेखाटली आहेत.

राज्यवृक्ष आंबा, राज्य पक्षी शेकरू, राज्य पष्य तामण राज्य फुलपाखरू नीलवंत, राज्य पक्ष हरियाल, राज्य कांदळवृक्ष पांढरी चिपी, राज्यमासा पापलेट अशी चित्रे या प्रवेशद्वारावर रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे हे प्रवेशद्वार अधिक आकर्षित झाले आहे.

चालू पावसाळ्यात साग, खैर, बाबू, जांभूळ, आवळा, पेरू अशी १ लाख रोपे नागरिकांना वाटपासाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. यासाठी जास्तीत नागरिकांनी नावनोंदणी करावी, असे आव्हान करण्यात येत आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:38 PM 09/May/2025