राजापूर-लांजा तालुक्यांतील पर्यटन विकासासाठी ३ कोटीचा निधी : उल्का विश्वासराव

लांजा : भाजपाच्या विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लांजा व राजापूर तालुक्यांमध्ये असणाऱ्या पर्यटन स्थळांचा पुनर्विकास करण्याच्या उद्देशाने, स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी तब्बल ३ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.

याबाबत माहिती देताना भाजपाच्या लांजा राजापूर विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव यांनी सांगितले की, लांजा व राजापूर तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यांचा विकास झाला तर त्याचा फायदा हा आपसूकच त्या तालुक्याला, गावाला होईल असे आपले ठाम मत आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले. पर्यटनस्थळे आजपर्यंत संपूर्ण क्षमतेने कार्यरत झाली पाहिजेत यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला. कामांची पूर्तता करण्यासाठी विधानसभा क्षेत्र ते विधानभवन अशा फेऱ्या करत, मंत्री महोदयांकडे स्थानिक प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची विनंती केली. आणि आज त्याचाच परिणाम म्हणून राजापूर व लांजा तालुक्यांतील जवळपास ११ पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:55 PM 10/Oct/2024