राफेल नदालची टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल ने (Rafael Nadal) टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 22 वेळा ग्रँड्स स्लॅम पटकवणाऱ्या राफेल नदालने डेविस कपच्या फायनलनंतर निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे.

पुढील महिन्यात डेविस कपच्या अंतिम सामन्यानंतर मी निवृत्ती घेणार असल्याचे राफेल नदाल याने स्पष्ट केले आहे.

मागील दोन वर्षे माझ्यासाठी फार कठीण होती

रफाल नदाल याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणाला,”मी टेनिसमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगण्यासाठी आज तुमच्यासमोर आलो आहे. मागील काही वर्षे माझ्यासाठी कठिण स्वरुपाची राहिली आहेत. खासकरुन मागील दोन वर्षे माझ्यासाठी फार कठीण होती.” स्पेनचा राफेल नदाल महान टेनिस खेळाडू म्हणून ओळखला जातो. राफेल नदाल 3 वर्षांचा असताना त्याने टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. नदाल आठ वर्षांचा झाल्यानंतर अंडर-12 मध्ये त्याने पहिला किताब जिंकला होता.

कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावले

नदालने आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपद पटकावून अलौकिक कामगिरी केली. वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत नदाल टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळला. पण त्याच्या काकांची इच्छा होती की त्याने टेनिसमध्येच करिअर करावे. नदालचे काका टोनी नदाल हे एक प्रसिद्ध फुटबॉलपटू होते. तरीदेखील त्यांनी फुटबॉलचा आग्रह न धरता टेनिस खेळण्यास प्रोत्साहन दिले.

सर्वात तरुण खेळाडू म्हणून ग्रँडस्लॅम पटकावले होते

सर्वाधिक 14 फ्रेंच ओपन जेतेपदे जिंकण्याचा विक्रम नदालच्या नावावर आहे. त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रॉजर फेडररने त्याच्या यशाचे नेहमीच कौतुक केले आहे. एकेरीत करिअर गोल्डन स्लॅम पूर्ण करणाऱ्या तीन पुरुषांपैकी नदाल हा एक आहे. त्याने 2010 मध्ये पुरुष एकेरी करिअर ग्रँडस्लॅम जिंकले होते,अशी कामगिरी करणारा तो ओपन एरामधील सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 10-10-2024