रत्नागिरी : कुवारबाव ते रत्नागिरी शहर मार्गावर रस्त्यांच्या कामामुळे वाहनचालकांना धुळीशी सामना करावा लागत आहे. शहरापासून रत्नागिरी रल्वेस्टेशनपर्यंत परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रमाण वाढल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सध्या या रस्त्यावर रूंदीकरणाचे काम सुरू असून पाऊस गेल्यानंतर तापदायक ठरत आहे. काही भागात चौपदरीकरण पूर्ण झाले असले तरी अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. चौपदरीकरणाच्या कामांतर्गत पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:48 10-10-2024