Breaking : बाळ मानेंना सेनेत घ्या; मात्र उमेदवारी नको

रत्नागिरी : बाळ माने ना पक्षात घेतले तरी चालेल मात्र उमेदवारी देऊ नये अशी विनंती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. रत्नागिरी विधानसभेला निष्ठावान शिवसैनिकालाच उमेदवारी मिळाली पाहिजे. सेनेमध्ये चार लायक उमेदवार असताना इतर पक्षातून उमेदवार घेऊन त्याला उमेदवारी देण्याची गरज नाही असे मत सेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आजच बीजेपीचे बाळ माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उमेदवारी लढण्याचे संकेत दिले होते. यावर आता सेनेतून अनेक मतं व्यक्त होऊ लागली आहेत. यावेळेला कोणत्याही परिस्थितीत निष्ठावान शिवसैनिकालाच उमेदवारी मिळाली पाहिजे असा आग्रह सेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, राकेश साळवी, महेंद्र चव्हाण, महेंद्र झापडेकर, प्रसाद सावंत आदी उपस्थित होते. सेना पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे आता नवीन ट्विस्ट निर्माण झाले आहे.