चिपळूण : केवळ १२ वर्षाची मनिषा अगदी लहानपणापासून तशी तब्बेतीने बारीकच. मुळातच जन्मताच तिला नवजात शिशु अतिदक्षता विभागात बरेच महिने जीवांची झुंज लढावी लागली होती. आता काही दिवस तिला सतत उलट्या होत होत्या. काहीही खाल्लेले पचत नव्हते. बऱ्याच डॉक्टरनी उपचार केले, सलाईन दिले पण व्यर्थ. शेवटी शरीरातील मीठ कमी झाले. परिस्थिती गंभीर झाली. मनिषा श्वास सुद्धा घेऊ शकत नव्हती अशा अवस्थेत तिला वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयात तिच्या सर्व तपासण्या केल्या आणि त्यात तिच्या मेंदूत एक गाठ सापडली. ही गाठ मेंदूवर दाब देत असल्याने उलट्या होऊन वजन घटले होते. ताबडतोब न्यूरो सर्जन डॉ. मृदुल भटजीवाले यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. शत्रक्रिया क्लिष्ट होती कारण गाठ दृष्टीच्या केंद्रावर दाब देत होती. त्यामुळे ऑपरेशन करताना जर त्या केंद्रावर इजा झाली तर दृष्टी जाण्याचीही दाट शक्यता होती. पण रुग्णालयातील मॉड्यूलर ऑपरेशन कक्ष, ऑपरेटिंग मिक्रोस्कोप, अद्ययावत यंत्रणा व निष्णात डॉक्टर यांच्या कौशल्यामुळे मेंदूतील गाठ इतर भागाला इजा न करता सुरळीत काढली गेली. शस्त्रक्रियेनंतर आता मनीषा पुन्हा जागी होऊन प्रतिसाद देईल का? तिची दृष्टी अबाधीत असेल का? याची उत्सुकता होती. हळूहळू मनिषाची प्रगती दिसू लागली. ती संवाद साधू लागली, तिच्या दृष्टीवर काहीही परिणाम झाला नाही. वजन वाढले आणि आता तर ती शाळेतही जाऊ लागली आहे. हे सर्व उपचार करताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे लाभ देखील तिला मिळाला. अशाप्रकारे मनिषाला जीवनदान तर मिळालेच पण गेल्या काही महिन्यात अशा अनंत रुग्णांना मेंदू विकारांपासून मुक्तता न्यूरो सर्जरी विभागामुळे मिळाली आहे.
वालावलकर रुग्णालयाने न्यूरोसर्जरी विभाग स्थापन केला आहे. त्या विभागाशी संलग्न, आवश्यक सुविधा जसे किएमआरआय, सीटी, डिजिटल सब ट्रॅक्शन अँजिओग्राफी अश्या सोयी उपलब्ध केल्या आहेत. मृदुल भटजीबाले आरडीएनबी न्यूरो सर्जन यांनी या विभागाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मेंदू रक्तस्त्राव, मेंदूची हाडे तुटणे, मणक्यातील गाठी मुळे होणारा लकवा, मेंदुतील रक्ताच्या गाठी, मेंदूतील पाण्याचा दाब वाढणे, झाडावरून पडणे अश्या अनंत रुग्णाचे प्राण वाचवणे शक्य झाले आहे.
विशेष म्हणजे १० ते ३० वर्षे बयातील १२ तरुण रुग्ण आणि बालके ह्याच्या मेंदूवर त्वरित शस्त्रक्रिया झाल्याने त्याचे प्राण वाचवता आले. तसेच ३१ते ५० वयोगटातील ३७रुग्णावर ओपेशन करून आजारापासून सुटका करण्यात आली आणि ५० हुन अधिक वयाच्या रुग्णामध्ये मधुमेह उच्च रक्तदाब आणि मेंदू तील आजार असूनही ५८ रुग्णांना जीवनदान मिळाले. ह्यातील अनेक रुग्णांना महात्मा फुले जण आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्यामुळे पुन्हा जगण्याची संधी प्राप्त झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:56 PM 12/May/2025
