देवरुख नगरपंचायतीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

देवरुख : देवरुख नगरपंचायतीचा १२ वा वर्धापनदिन नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचारीवृंदानी विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमांची सुरुवात शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरी यांच्या मदतीने रक्तदान शिबिराने करण्यात आली. नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरपंचायत कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यामध्ये देवरुख नगरपंचायत कर्मचारी व शहरातील रक्तदाते मिळून एकूण ३४ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

स्थापना दिनाच्या दिवशी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सामाजिक जाणिवेच्या भूमिकेतून गोकुळ बालगृह देवरुखकरिता देणगी स्वरुपात वस्तू व प्रशासक तथा मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी दोन अग्नीशमन सिलेंडर देऊन सहकार्य केले. फनी गेम्स, संगीत खुर्ची, रस्सीखेच यासारखे खेळ तसेच अंताक्षरी, अभंग, विविध गुणदर्शन इत्यादी कार्यक्रमांनी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:00 AM 11/Oct/2024