IPL 2025 Playoff Chances: ‘आयपीएल’मधून 3 संघ बाहेर, 7 संघांमध्ये चुरस.. मुंबई इंडियन्स बाहेर जाणार?; जाणून घ्या सर्व संघाचे प्लेऑफचे समीकरण

IPL 2025: भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित 17 सामने 17 मेपासून पुन्हा खेळविण्यात येतील. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबतचे नवे वेळापत्रक जाहीर केले असून, प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे स्थळ अद्याप जाहीर केलेले नाहीत.

यंदाचा अंतिम सामना 3 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामात एकूण 17 सामने शिल्लक आहेत. त्यापैकी 13 सामने लीगचे आहेत. उर्वरित चार सामने प्लेऑफचे आहेत. सर्व लीग सामन्यांची ठिकाणे जाहीर करण्यात आली आहेत. आणि प्लेऑफचे सामने कोणत्या मैदानावर खेळवले जातील? हे नंतर जाहीर केले जाईल.

आयपीएल 2025 मधील उर्वरित लीग सामने दिल्ली, लखनौ, जयपूर, मुंबई, अहमदाबाद आणि बेंगळुरू येथे होतील. 17 मे रोजी स्पर्धा पुन्हा सुरू झाल्यावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स एकमेकांसमोर येतील.

आतापर्यंत तीन संघ आयपीएल 2025 मधून बाहेर पडले आहेत. यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सचा समावेश आहे. त्याचवेळी, उर्वरित सात संघांमध्ये प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची शर्यत अजूनही सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

गुजरात टायटन्स 11 सामन्यांत 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तर आरसीबी 11 सामन्यांत 16 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाब किंग्ज 11 सामन्यांत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स 11 सामन्यांत 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

कोलकाता नाईट रायडर्स 12 सामन्यांतून 11 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. तर लखनौ सुपर जायंट्स 11 सामन्यांत 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे. या सात संघांमध्ये प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचा क्वालिफायर-1 ही 29 मे रोजी आणि एलिमिनेटरचा सामना 30 मे रोजी खेळला जाईल. क्वालिफायर-2 चा सामना 1 जून रोजी होईल. तर अंतिम सामना 3 जून रोजी खेळवला जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:06 13-05-2025