दापोली : पंधरा वर्षांनंतर जामगे धरणाचे काम पूर्णत्वाला जाणार

दापोली : तालुक्यातील जामगे धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. तब्बल १५ वर्षानंतर धरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याने पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे धरण पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

तालुक्यातील सातेरे जामगे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावे, त्याचबरोबर या भागातील पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने २००९ साली लघु पाटबंधारे विभागामार्फत हे धरण मंजूर झाले होते. त्यानंतर सन २०१० ला प्रत्यक्षात धरणाच्या कामाला सुरुवात झाली. पण, अवघ्या काही दिवसातच काम बंद पडले. पुन्हा सन २०१३ ला कामाला सुरुवात ४.२ मीटर इतकी धरणाची साठवण क्षमता झाली. मात्र, ठेकेदारांनी काम सोडले. त्यानंतर सन २०१९ ला पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र, शेतकऱ्यांनी विरोध केल्याने ठेकेदाराने काम अर्धवट सोडले.

दापोली तालुक्यातील जामगे धरणाचे काम वेगाने सुरू असून, हे धरण पूर्ण झाल्यास सातेरे जामगे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. या धरणाच्या कामाला पुन्हा २०२४ मध्ये सुरुवात करण्यात आली. सद्यस्थितीत ७० टक्के धरणाचे काम पूर्ण झाले आहे. सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे. जामगे धरणाचा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना फायदा होणार असून, जवळजवळ १५ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:39 PM 13/May/2025