चिपळूण : शहरात असलेल्या सुमारे १ हजार इमारतींपैकी ४९३ इमारती धोकादायक आहेत. तर सुमारे ५०० घरांपैकी १३५ घरांना दरडीचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून नगर परिषद प्रशासन अलर्ट मोडवर असून सध्या संबंधितांना नोटीसा देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
त्यांना तात्पुरत्या स्थलांतरासह काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. शहरात सुमारे ३२ हजार ५०० सदनिका आहेत. त्यांचा विचार करता १ हजार इमारती आहेत. त्यातील ४९३ इमारती अनेक कारणांमुळे धोकादायक ठरवण्यात आल्या आहेत. तर असलेल्या सुमारे ५०० घरांपैकी १३५ घरांना दरडीचा धोका आहे. यातील बहुतांशी घरे खेड, कांगणेवाडी, ओझरवाडी, मतेवाडी, गोवळकोट या भागातील आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:44 PM 13/May/2025














