मंडणगड : विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील टाकेड गावठणवाडी येथील विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवार १२ मे रोजी दुपारी २ वा. सुमारास घडली. याबाबत मंडणगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रज्योत प्रदीप जाधव (२५, मूळ रा. आचोले तलाव, नालासोपारा, जि. पालघर सध्या रा. टाकेड गावठणवाड, मंडणगड) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रज्योत हा सुट्टीनिमित्त मंडणगडला आला होता. सोमवारी दुपारी १२ वा. सुमारास तो टाकेड गावठणवाडी येथील सार्वजनिक विहिरीमध्ये इतर मुलांसोबत पोहायला गेला होता. पोहत असताना तो अचानकपणे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास मंडणगड पोलिस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 14/May/2025