आजचे राशीभविष्य, १४ मे २०२५

मेष – आजचा दिवस आगळा – वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल.

वृषभ – आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल.

मिथुन – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील.

कर्क – शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे.

सिंह – आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल.

कन्या – आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे.

तूळ – आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल.

वृश्चिक – आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा – समाधानाचे वातावरण राहील.

धनु – स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल.

मकर – आजचा दिवस लाभदायी आहे. सगे – सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल.

कुंभ – व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल.

मीन – शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 14-05-2025