खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाच्या अध्यक्षपदी मंदार हळदे यांची निवड

खेड : तालुका बौद्ध समाज सेवा संघाची नूतन कार्यकारिणी निवड नुकतीच झाली. अध्यक्ष म्हणून निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मंदार हळदे यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे बहुमताने निवड झाली. उपाध्यक्षपदी वामन तांबे, सुधाकर धोत्रे, संजय मोहिते व भरत पवार यांची निवड झाली. सरचिटणीसपदी चंद्रसेन मोहिते तर चिटणीसपदी सुरेश तांबे, संजिवन कदम, मोतिराम जाधव, विलास तांबे यांची निवड झाली तर खजिनदारपदी संदिप सावंत तसेच स्विकृत सदस्य म्हणून अरविंद गमरे, भागुराम तांबे, श्याम मोहिते, दयानंद कासारे व महेंद्र गमरे यांची निवड झाली तर महिला स्वीकृत सदस्या म्हणून निवृत्त आरोग्य सेविका रिना तांबे यांची निवड झाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 11/Oct/2024