साहित्यनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाजाचा विकास होतो : अरुण इंगवले

चिपळूण : काव्यप्रेमी शिक्षक मंच, सोलापूर या राज्यस्तरीय साहित्यिक संस्थेच्या वतीने ११ मे रोजी चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या (लोटिस्मा) बाळशास्त्री जांभेकर सभागृहात मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट साहित्य रचनांना काव्यप्रेमी साहित्य पुरस्कार तर काव्यप्रेमी परिवारातील सर्वोत्कृष्ट योगदानाकरिता काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.


काव्यप्रेमी शिक्षक मंचचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना चिपळूण येथील ज्येष्ठ कवी, नाटककार तथा लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष अरूण इंगवले यांनी साहित्यनिर्मिती करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाजाचा विकास होतो आणि संस्कृतीची जपणूक उत्तम होते, असा गौरवोद्रार काढले.

यावेळी काव्य पीठावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, चिपळूणचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, संचालक प्रदीप पवार, प्राची जोशी, कार्यवाह सुमेध करमरकर, लोकमान्य टिळक वाचनालय कार्याध्यक्ष इतिहास पुराणवस्तू संशोधक अभ्यासक लेखक प्रकाशजी देशपांडे, प्रवचनकार धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, योगेश बांडागळे, म.सा.प. चिपळूणचे अध्यक्ष प्रा. संतोष गोणवरे, प्रकाश गांधी, डॉ. राजरत्न सावंत, काव्यप्रेमीचे राज्य सचिव कालिदास चवडेकर, डॉ. सत्येंद्र राऊत, रामदास देशमुख, लोकमान्य टिळक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयचे ग्रंथपाल, सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तानाजीराव चोरगे, कोमसाप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलके यांनी संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या. डॉ. दाक्षायणी पंडित (पुणे) नीला नातू (चिपळूण), डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी), सीमा झुंजारराव (मुलुंड), अविनाश चिंचवडकर (बेंगलुरू), किरण वेताळ (पुणे), सई बने (डोंबिवली), नयना निगळ्ये (न्युयॉर्क, अमेरिका), आनंद सांडू (चेंबूर), डॉ. दिनेश वाघुंबरे (सांगली), सौ. रश्मी गुजराथी (पुणे), विजय जोशी (डोंबिवली) यांना काव्यप्रेमी साहित्य पुरस्काराने तर मुकेश विशे (ठाणे), कविता दाते (वर्धा), गजानन पाटील (सांगली), प्रमोद भागवत (अमरावती), श्रीमंत कोळी (सोलापूर), सिराज शिकलगार (सांगली), श्रीमती अश्विनी धाट (धाराशिव), गणेश खडके (अमरावती), सौरभ नवले (पुणे) यांना काव्यप्रेमी प्रेरणा पुरस्काराने आणि विजय फडणीस (मुंबई) यांना यंदाचा काव्यप्रेमी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या शिवाय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पूर्वी सकाळी ९ वाजता कराड येथील कृषी अधिकारी चंद्रकांत कोळी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ गझलकार बबन धुमाळ यांनी राज्यस्तरीय कवी संमेलनाचे संविधान ग्रंथ पूजन करून उद्घाटन केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 14/May/2025