रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे १५ मे रोजी लांजात मेळावा

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे येत्या १५ मे रोजी लांजा येथे माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

लांजा येथील प्रा. मधु दंडवते सभागृहात माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीरमाता, वीरपिता यांचा हा मेळावा होणार आहे.

मेळाव्यात पेन्शनविषयक, अभिलेख कार्यालयविषयक, महासैनिक पोर्टलवर रजिस्ट्रेशन (नोंदणी) तसेच इतर अडचणी सोडविण्यात येतील.

मेळाव्याला येताना सोबत डिस्चार्ज पुस्तक, पी.पी.ओ. ची प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, इ.सी.एच.एस. कार्ड व आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल फोन असणे आवश्यक आहे. मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:42 14-05-2025