गणपतीपुळे : गणपतीपुळेतील रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील सुर्वे स्टॉप ते भेलापऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून गणपतीपुळे येथील शिवसेना उपतालुकाप्रमुख राजेश साळवी, शिवसेना शाखाप्रमुख कल्पेश सुर्वे, गणपतीपुळे येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठावरे, तंटामुक्ती अध्यक्ष समीर कदम यांनी हा रस्ता बनवण्यासाठी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्याकडे संपर्क साधला होता.
त्यांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेतली आणि रस्त्याचे डांबरीकरण सुरू केले. त्यामुळे आता नागरिक व प्रवाशांची होणारी गैरसोय थांबणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:25 PM 14/May/2025














