रत्नागिरी : शहरानजीकच्या फणसोप येथे किरकोळ कारणातून चायनीज सेंटरवर एकाला मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवार १२ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
संकेत संजय गुजर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात महेंद्र मधुकर साळवी (वय ५६) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री फिर्यादी आपल्या मित्रांसह संशयित संकेतच्या दुकानातून दारु घेऊन त्याच्याच चायनीज सेंटरच्या खुर्चा घेऊन बसले होते. तेव्हा संकेतने त्यांना तुम्ही चायनीज सेंटरच्या खुर्चा घेऊन बसू नका, असे सांगितले. त्यावर फिर्यादीने खुर्य्याच घेतल्यात थोडा वेळ बसतो, असे सांगितले.
दरम्यान, या गोष्टीचा राग आल्याने संकेतने त्यांना शिवीगाळ करत चायनिजचा लोखंडी डाऊल फिर्यादीच्या डोक्यात मारुन दुखापत करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 15/May/2025














