रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथे टेम्पो पार्क करण्याच्या वादातून एकाला दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार १३ मे रोजी सायंकाळी ६ वा. सुमारास घडली. मनोज गणपत किर आणि त्याचा ड्रायव्हर (नाव गाव माहीत नाही) यांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्या विरोधात फिर्यादी ईशान दीपक नागवेकर (वय ३५) याने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी सायंकाळी ईशान नागवेकर हा त्याचा टेम्पो (एमएच-०८-एएच-१९७१) हा त्याचा ड्रायव्हर तानाजी माने याचेकरवी तेथील मंदिराच्या पाठीमागे पार्किंग करत होता.
तेव्हा संशयित मनोज किर आपल्या ड्रायव्हरसह तिथे आला. त्याने ईशानला तू येथे टेम्पो पार्किंग करायचा नाही, असे सांगितले. त्यावर ईशानने मी इथला स्थानिक आहे. मी रोज माझा टेम्पो या ठिकाणीच पार्क करतो, असे सांगितले. याचा राग आल्याने मनोज किरने ईशानचा गळा आवळला. तर त्याच्या ड्रायव्हरने बाजूचा दगड उचलून तो ईशानच्या डोक्यात मारुन दुखापत केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 15/May/2025














