रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत मत्स्य महाविद्यालय शिरगाव, रत्नागिरी येथे कुलगुरू, डॉ. संजय भावे व संचालक, विस्तारशिक्षण डॉ. पराग हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य खाद्य निर्मिती तंत्रज्ञान आणि खाद्य व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण दोन दिवस झाले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे अध्यक्षस्थान डॉ. सुधाकर इंदुलकर, सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी यांनी भूषवले. मत्स्य संवर्धनामध्ये एकूण खर्चाच्या ६० ते ७० टक्के खर्च मत्स्य खाद्यावर होतो. योग्य दर्जाचे घटक निवडून व आधुनिक मत्स्य खाद्यनिर्मिती तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास निश्चितपणे हा खर्च मत्स्य शेतीमध्ये कमी करता येतो. मत्स्य शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण आल्यास या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर देखील मार्गदर्शनासाठी मत्स्य महाविद्यालय सदैव खुले आहे, याची ग्वाही मत्स्य महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता, डॉ. सुधाकर इंदुलकर, यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली. नचिकेत जगे, आत्मा, पेण या संस्थेचे संचालक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील डॉ. बी. आर. चव्हाण, डॉ. आर. के. सदावर्ते, डॉ. व्ही. बी. मुळये, प्रा. एम. टी. शारंगधर, डॉ. आर. एम. तिबिले, डॉ. एस. एस. वासावे, डॉ. व्ही. आर. भाटकर, पूनम शिर्के, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सहायक मत्स्य आयुक्त, मत्स्य व्यवसाय विभाग, रत्नागिरी या विविध प्राध्यापकांनी तसेच वक्त्यांनी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रक्षेत्र भेटीसाठी प्रशिक्षणार्थीना आधुनिक यंत्राद्वारे मत्स्य खाद्यनिर्मिती बनवण्याचे तंत्रज्ञान मिळविण्यासाठी मत्स्यकुटी निर्मिती करणारी टी. जे. मरीन, रत्नागिरी तसेच प्रो इंडो अॅक्वा फिशफीड, बोरपाडले, जि. कोल्हापूर येथे प्रक्षेत्र भेटी आयोजित केली. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार प्रदर्शन डॉ. राहुल सदावर्ते यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 11/Oct/2024














