दापोली- दाभोळ मार्गावर दोन एसटी बसमध्ये अपघात

जालगाव : दापोली- दाभोळ रोडवरील वळणे नजीक एका अवघड वळणावर दोन एसटी बसेस यांचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये एसटी चालक किरकोळ जखमी झाले असून ही घटना १५ मे २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

या बाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी भास्कर शामराव दर्शने (३४, रा. काळकाई कोंड दापोली) हे दापोली आगारातून दापोली ते कळकी बस (क्र. एम एच १४ बीजे २५८९) हे घेऊन सकाळी ८ आठ वाजण्याच्या सुमारास जात असताना दापोली दाभोळ रोडवरील वळणे फाटा समोरील एका वळणावर संशयित आरोपी मारुती आनंदराव कराड (रा. रुपनगर) यांच्या ताब्यातील बस (क्र. एम एच १३ सी यु ६८३७) उंबरघर ते दापोली घेऊन येत असताना रस्त्याचा अंदाज न घेता त्यांनी दापोली ते कळकी जाणाऱ्या बसला समोरासमोर धडक दिली.

यात भास्कर दर्शने हे मुका मार लागून किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी आरोपी मारुती कराड यांच्यावर दापोली पाल्लिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार गायकवाड हे करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 AM 16/May/2025