सावर्डे : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मराठी भाषा शिक्षक जयंत काकडे यांनी रत्नागिरी जिल्ह्यात व चिपळूण तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून उत्तुंग यश मिळवले आहे.
महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित इयत्ता नववी व दहावी या भाषा विषय गटामध्ये जयंत काकडे यांनी विरामचिन्हे या घटकावर आधारित अभ्यासपूर्वक दर्जेदार व्हिडीओची निर्मिती करून सहभाग घेतला. तसेच त्यांनी केलेल्या या शैक्षणिक व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाची सोय निर्माण केली आहे. स्पर्धेचे परीक्षण डाएटचे प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील निवड समितीने केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत विकास करण्यासाठी जयंत काकडे यांनी विविध घटकावर आधारित दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्माण केले आहेत. या व्हिडीओचा लाभ युट्यूबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घेत आहेत.
या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेव भुवड, सर्व संचालक, पदाधिकारी, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदींनी कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 11/Oct/2024