लांजा तालुक्यात विजेचा खेळखंडोबा

लांजा : पावसाळा येताच तालुक्यातील विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरणने झाडे तोडणे, देखभाल दुरुस्ती, जीर्ण खांब बदलणे यासारखी कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते; मात्र पावसाळा तोंडावर आल्यावर महावितरण विभागाची धावपळ होते.

त्यामुळे ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरवात होताच वीज गायब होते. त्यामुळे पाऊस पडल्यावर थोडासा दिलासा मिळत असला तरी नंतर असह्य उकाड्याने नागरिक हैराण होतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 16/May/2025