खरे-ढेरे महाविद्यालयाच्या वतीने गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता

गुहागर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून नेहरू युवा केंद्र रत्नागिरी व गुहागर एज्युकेशन सोसायटीचे खरे-ढेरे महाविद्यालय, महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठानतर्फे स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत सागरी किनारी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. स्वच्छता कार्यक्रमात गुहागर एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी संदीप भोसले, संचालक मनोज पाटील, प्राचार्य डॉ. एम. आर. गायकवाड, प्रा. रश्मी आडेकर, प्रा. नीळकंठ भालेराव, डॉ. आनंद कांबळे, डॉ. रामेश्वर सोळंके, समृद्धी घडवले, निशिता मर्चेंडे, प्रणिता रोहीलकर, रसिका कांबळे, दीक्षा पवार, रिंकी आग्रे, सिद्धी महाडे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गायकवाड, संदीप भोसले, मनोज पाटील, एनएसएस विभाग, एनसीसी विभागाने परिश्रम घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 11/Oct/2024