मी शब्दाचा पक्का.. एखाद्याला पाडायचं म्हटलं तर पाडतोच : अजित पवार

पुणे : मी शब्दाचा पक्का आहे, एखाद्याला सांगितलं की खासदार करतो तर करतोच. मी एखाद्याला सांगितलं की याचा काटा काढतो, तर त्याचा काटा काढतोच. एखाद्याला सांगितलं की याला पाडतो, तर त्याला पाडतोच…

अशी तुफान फटकेबाजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या प्रचारासाठी इंदापूर तालुक्यातील अकोले गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली.

इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावणारच, मी शब्दाचा पक्का आहे असं अजित पवार म्हणाले. लोकसभेला, विधानसभेला कुणी कुठले काम केले हे न बघता 53 गावातील लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले की, “छत्रपती सहकारी साखर कारखाना हा शरद पवार साहेबांनी तसेच घोलप,जाचक यांनी उत्तम चालवला. आम्ही राज्यातील अनेक कारखाने उभे केले. काही बिनविरोध देखील केलेले आहेत. छत्रपतीसाठी देखील बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं. इंदापूर तालुक्यातील कारखान्यांपेक्षा तुलनात्मक जादा दर छत्रपती कारखाना देतो.”

Ajit Pawar Indapur Speech : अजित पवार काय म्हणाले?

दौंड येथील भीमा पाटस कारखाना देखील सुभाष अण्णा कुल आणि काकासाहेब यांच्या काळात चांगला चालला. पुढे तो बंद पडला आणि एका खासगी कंपनीला चालवाय द्यावा लागला. कारखाने आपले वैभव आहेत. ते चांगले चालले पाहिजेत. कारखान्याला चांगला भाव दिला तर सभासदांच्या मुलाबाळांचा प्रश्न मार्गी लागतो, ते घर बांधू शकतात. महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता आलेली आहे.

यापूर्वी आपला भाग जिरायत म्हणून बघितला जायचा. मात्र मी आणि दत्ता भरणे यांनी ताकत लावून लाकडी निंबोडी प्रकल्प आणला. बारामती इंदापूर तालुक्यातील याचा फायदा झाला.

साखर कारखान्याबरोबरच येथील स्थानिक पाण्याचा प्रश्न आहे. शेटफळ, अकोले, न्हावी, रुई कळस या भागात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खडकवासल्यातून पाणी देण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. पूर्वी पुण्याला खडकवासलातील पाच टीएमसी पाणी लागायचं. आता 22 टीएमसी पाणी लागते. अगोदर प्यायला नंतर उद्योगाला तिसरं शेतीला असं राज्य सरकारचे मागे धोरण होतं. मुळशीचे धरणाचे पाणी वीज तयार करण्याचे अनेक प्रकार निघाले आहेत ते पाणी तालुक्याला आणण्याचा प्रयत्न राहील.

नीरा नदीच पाणी उजनीत घालायचं. मराठवाड्याच्या हक्काच पाणी त्यांना द्यायचं. पाण्यावर सर्वांचा हक्क आहे. मी पाण्याबद्दल एक कायदा आणला. टेल टू हेड पाणी मिळाले पाहिजे. शेटफळ अकोले निंबोडी असे 213 किलोमीटर अंतर होते. जानाई शिरसाई पाणी बंद पाईपलाईन मधून आणले.

दौंडच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, तसेच बारामती, इंदापूर पर्यंत ते पाणी येईल. फळबागा टिकवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतात. शरद पवार यांनी तसेच मी देखील आता ते टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

साडेसातशे पंप या भागात आहेत. शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केलं. माझ्याकडे अर्थ खाते असल्यामुळे वीस हजार कोटी रुपये दिले. त्यामुळे आम्ही काही फुकट देणार नाही. एसटीमध्ये महिला ज्येष्ठांना सवलत दिली त्याचा भार सरकारला सोसावा लागतो.

इंदापूर तालुक्याला पाणी देताना मला बारामतीकरांना सांगावं लागतं, त्यांचे हक्काचा पाणी आहे. कालव्याला अच्छादन केले. त्यामुळे बारामतीतील जळोची पर्यंत पाणी थांबत नाही सुरळीतपणे जातं. मात्र या सिमेंट काँक्रीटच्या आच्छादनामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला की आमच्या विहिरींना पाणी पाझरणार नाही. पाझर असेल, गळती वळणे असतील त्या कालव्याला आच्छादन करण्यासाठी तुम्ही शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

बंद पाईपलाईन शिवाय यापुढे पर्याय नाही. फक्त मी मते मागायला आलो नाही. कारण पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक आहेत. बारामती पुरंदर भागात मी काम केले आहे. उपसा सिंचन योजनेची कामे पावणे चारशे कोटी रुपयांपर्यंत केली आहेत. पाणी व्यवस्थित मिळाव यासाठीच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून देखील पाणी आणावे लागेल. 500 कोटी रुपये त्यासाठी ठेवले आहेत.

पाणी महत्वाचे आहे तुमच्या जागी मी असतो तरी देखील कॅनॉलमध्येच डायरेक्ट सबमर्सिबल टाकून पाणी घेतले असते. पाणी म्हणजे जीवन आहे.

छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीसाठी मी मते मागायला आलो आहे. 21 संचालक दिली असून आणखी दोन स्वीकृत संचालक आमच्या हातात आहेत. मतदान जास्तीचे झाले की त्या गावाला संधी देणार. कपबशी चिन्हावर मतदान करा.

शेतकरी देखील हुशारी करतात दहाची असेल तर साडेसात ते लेबल लावतात. साडेसात हॉर्स पावरला वीज माप असेल. शेतकऱ्याला मानलं पाहिजे. मी देखील शेतकरी आहे.

दत्ता भरणे यांनी मला गाडीत सांगितले की दादा या भागात पूर्वीचा आमदार होता तेव्हा पाणी येत होतं. मात्र तो आमदार बारा वर्षांपूर्वी होता. पुणे त्यावेळेस वाढलेलं नव्हतं. ज्या पद्धतीने मुळशीतून मुळा नदीत पाणी सोडले आहे, घोटावडे येथे तशा पद्धतीने मार्ग काढावा लागेल.

टाटा म्हणजेच मुळशी धरणातचे वीज निर्मिती करत असतील तर त्यांना आपण आपली वीज देऊ. मात्र या धरणाचे पाणी आपल्या भागात आणू मार्ग काढू.

काही चुका झाल्या त्या आम्ही दुरुस्त करतो. शेवटी जो चुकला तोच काम करतो. तुमच्यातील काहींकडे काही कल्पना व्यवहारिक असेल असतील तर त्या अधिकाऱ्यांना सांगून करूयात. दोन-तीन गोष्टींचा पर्याय ठेवून पुढे जाऊया पाण्याचा प्रश्न सोडवू या.

छत्रपती साखर कारखाना हा इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव द्यायचा आहे. सोमेश्वर कारखान्याचा देखील असा शब्द दिला होता. त्याला महाराष्ट्रात पाच नंबरमध्ये आणला.

छत्रपतीला देखील आपण मागील 10 वर्षे जे संचालक होते त्यांना न घेता नवीन लोकांना संधी दिली आहे. हे त्या कारखान्यात माझ्या समक्ष सांगतो. चहा शिवाय काही घेणार नाही. गाडी देखील नाही, चेअरमन सहित कोणताही संचालक गाडी मागणार नाही. स्वतःची गाडी पेट्रोल वापरून काम करतील.

सीझन सुरू झाल्यानंतर रस मिळेल, पक्षीय जोडे बाजूला ठेवून आम्ही कारखान्यासाठी लढतो आहोत. काहीजण नाराज झाले असतील मात्र वेळ द्यावा लागेल. हा संचालक जवळचा, लांबचा असा भेदभाव करणार नाही. संपूर्ण कारखान्याचं स्थिरस्थावर करू पाण्याचा प्रश्न मार्गी लावू..

माजी केंद्रामध्ये ओळख आहे. राज्यात आपले सरकार आहे इतर खाती भाजपकडे आहेत. आमच्या आजोबांनी, पणजोबांनी डबे आणून हा कारखाना काढला आहे. हे वैभव त्याला थोडी दृष्ट लागली आहे. तुमच्या रूपाने तो काळा डाग पुसायचा आहे.

आपण हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू. तेवढी ताकत आणि धमक आपल्यात आहे. विरोधक म्हणत होते सभासद रद्द करणारे एकत्र आलेत. आम्ही कोणाचे सभासद रद्द केले केलेले नाही.

कोणतेही काम आम्ही मागे ठेवणार नाही. अमित शहा यांच्याकडे जाऊन कारखाना चांगल्या पद्धतीने चालवू. पाच वर्षे पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आमची.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 16-05-2025