पावसाच्या पार्श्वभूमीवर घरांच्या डागडुजीला वेग..

राजापूर : तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने काही दिवसांपासून हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात जुनी घरे आणि गोठे यांच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे.

परंतु सध्या कामगार मिळणे अवघड झाल्याने अशा कामगारांची प्रतीक्षा करावी लागत आहे. एकीकडे पासाळापूर्व खरेदी करतानाच घरांच्या डागडुजीकडेही लक्ष दिले जात आहे. कौलारु घरांऐवजी स्लॅबची घरे वाढत असली तरी ग्रामीण भागात अजूनही कौलारू घरांचे प्रमाणच अधिक आहे. मात्र तेथे मनुष्यबळाची समस्या अधिक तीव्र झाली असल्याने या कामाला वेळ लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 16/May/2025