‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेनं घेतला प्रेक्षकांचा निरोप

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava). या मालिकेतील आनंदी आणि सार्थकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. या मालिकेत आनंदीची भूमिका अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) हिने साकारली होती.

१० ऑक्टोबर रोजी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री दिव्या पुगावकरने सोशल मीडियावर मालिकेसंदर्भात एक पोस्ट केली आहे, जी चर्चेत आली आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकरने मालिकेच्या संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आज आनंदीचा प्रवास इथेच संपतोय पण दिव्या तुम्हाला अशाच वेगवेगळ्या पात्रांद्वारे भेटायला येत राहील. अजूनपर्यंत जे प्रेम आणि आशिर्वाद देत आलात ते पुढेही कायम असू द्या…

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 11-10-2024