लांजा : वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये अंदाजपत्रकानुसार काम न करता नळपाणी योजनेत भ्रष्टाचार झाला असून कामाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी लांजा तालुका पंचायत समिती वेरवली गण प्रमुख भरत कोळवणकर यांनी उपअभियंता पाणीपुरवठा उपविभाग यांच्याकडे केली आहे. लांजा तालुक्यामध्ये बेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीवर विद्यमान सदस्य असणारे भरत कोळवणकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेरवली बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन पंधरावा वित्त आयोग योजनेंतर्गत नळ जोडणी सुरू आहे. मात्र, योजनेच्या निविदेनुसार काम होणे अपेक्षित असताना जुन्याच नळ कनेक्शन लाईनवर नागरिकांना पाणी कनेक्शन करून दिली जात आहे. भरत कोळवणकर यांनी पाणी पुरवठा विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेरवली बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमध्ये जलजीवन मिशन व पंधरावा वित्त आयोग सन २०२२-२३ अंतर्गत रामवाडी येथे खासगी कनेक्शन करणे काम सुरू आहे. हे काम सर्व कनेक्शन जुन्या लाभार्थी कनेक्शन वरूनच जोडण्यात येत आहे.
प्रत्येक नळ जोडणीला अंदाजपत्रकाप्रमाणे ४३१७ प्रमाणे एकूण ९४ कनेक्शन जोडण्यात येत असून अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत नाही आहे. कामाचे मूल्यांकन दाखला देण्यात येताना ग्रामपंचायत सदस्य व लाभार्थी यांना समक्ष घेऊनच देण्यात यावे. तसेच त्यांच्या समक्ष सर्व कनेक्शन खुले करून संमती अधिकाऱ्याकडून पाहणी करून निर्णय घेण्यात यावा. याचबरोबर जलमिशन मधून ३७ कनेक्शनसाठी रकम १ लाख ५९८०० अधिक ५१ कनेक्शनसाठी रक्कम रुपये १ लाख २४ हजार ८४६ हे पंधरावा वित्त आयोगामधून खर्च करण्यात येत आहेत. असे एकूण रकम २ लाख ८४ हजार ६४६ रु. इतका खर्च होत आहे. त्याबाबत माहिती ग्रामपंचायत सोबत त्या योजनेचे लाभार्थी यांना समक्ष घेऊनच देण्यात यावी व मूल्यांकन दाखला देण्यात येऊ नये, अशी मागणी भारतीय जनता पार्टी पं. स. गणप्रमुख भरत कोळवणकर यांनी उपअभियंता पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 11/Oct/2024














