रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा-पंधरामाड येथील पाटील बोळमधील रस्त्याची मोजणी करण्यासाठी शहर भूमापन आणि रत्नागिरी पालिकेचे पथक गेले होते. परंतू या रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या रहिवाशांनी हरकत घेतल्याने या पथकाला मोजणी न करताच परतावे लागले.
मंजूर विकास आराखड्यातील नगररचना योजनेंतर्गत रत्नागिरी शहरात नवीन रस्ते करणे, अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शहर भूमापन कार्यालयाकडून संबंधित रस्त्यालगतच्या हिस्सेदारांना मोजणीची नोटीस पाठवून उपस्थित राहण्यास सांगितले जात आहे. त्यानुसार पाटील बोळ येथील रस्त्याच्या मोजणीसाठी आजुबाजूच्या रहिवाशांना काल मोजणीवेळी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते.
शहर भूमापन अधिकारी कार्यालयाचे गणेश गोवेकर, रत्नागिरी पालिकेचे आनंद थोरात या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोजणी पथक पाटील बोळ येथे आले. त्यावेळी याठिकाणच्या सुर्वे, मयेकर, पाटील, चैदवणकर व इतर कुटुंबातील व्यक्ती आल्या आणि मोजणीला हरकत घेतली.
या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी या रहिवाशांची जागा जाण्याची भीती असल्याने ही हरकत घेण्यात आली. अखेर मोजणी पथकाने दोन पंचासमक्ष त्यांची लेखी हरकत घेतली आणि मोजणी न करताच हे पथक दुसऱ्या ठिकाणच्या मोजणीसाठी निघून गेले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 17/May/2025












