चिपळूण : शहरातील रस्त्यांच्या साईडपट्ट्या बोगस पद्धतीने भरल्या जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. गेल्या वर्षभरापासून गॅस पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई केली जात असल्याने त्याची वाट लागत आहे.
त्याता आता लाखो रुपये खर्चुन केल्या जात असलेल्या साईडपट्टयाही निकृष्ट पद्धतीने भरल्या जात आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
गेल्या वर्षभरापासून घराघरात येणाऱ्या गॅससाठी शहरातील चांगल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई केली जात आहे. त्यामुळे सुरुवातीला या कामावर माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेत गॅस पाईपलाईनचे काम झाल्यावर रस्त्यांचे काय होणार असा पश्न उपस्थित केला होता.
त्यानंतर रस्ते चांगले करून दिले जातील असे आश्वासन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर संबधित गॅस कंपनीकडून भरपाई म्हणून लाखो रुपये पालिकेने घेतले आहेत. यातूनच गेल्या काही दिवसांपासून साईडपट्ट्या भरण्याचे काम सुरू केले आहे.
ही कामे खिरापतीसारखी वाटण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदार ती करीत आहेत. मात्र कामे बोगस पद्धतीने होत आहे. केवळ माती व खडी पसरली जात आहे. पावसाळ्याचा विचार करता संबधित ठेकेदार घाईगडबडीने कामे करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
सध्या साईडपट्या भरण्याचे सुरू असलेले काम सुमार दर्जाचे आहे. ते योग्य पद्धतीने काम घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे. त्यामुळे कामाची हमी घेऊनच प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी- शशिकांत मोदी, शहराध्यक्ष, भाजप, चिपळूण
साईडपट्ट्यासाठी मुरूम व खडीचे दोन थर राहणार असून त्यावर बारीक खडी व डांबर टाकले जाणार आहे. हे काम योग्य पद्धतीने करून घेतले जाईल- दीपक निंबाळकर, नगर अभियंता, चिपळूण पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 17/May/2025














