रत्नागिरी : सुशोभीकरण झालेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील रिक्षा व्यवसायिकांनी स्वच्छता गृह आणि सुलभ शौचालयाची व्यवस्था व्हावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
श्री. चव्हाण यांनी याबाबत तात्काळ सूचना केल्या आहेत या सूचनांची अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तत्काळ व्हावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केली आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्था झाल्यास रिक्षा व्यावसायिकांना फायदा होणार आहे.
भाजपातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, तालुकाध्यक्ष दादा दळी, शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप नाचणकर, उमेश देसाई, संकेत कदम, संतोष बोरकर, नीलेश आखाडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:15 11-10-2024













