खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन कार सुमारे १०० फूट खोल कोसळून अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईहून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना हा अपघात झाला. या घटनेत कारचालक गंभीर जखमी झाला आहे. तर, पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मेधा परमेश पराडकर ,सौरभ परमेश पराडकर (22),मिताली विवेक मोरे (45) , निहार विवेक मोरे (19), श्रेयस राजेंद्र सावंत (23) या पाच जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला असून यामध्ये दोन कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्बजण मुंबईवरून देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघाल असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
दोन्ही कुटुंबे मुंबई मिरा रोड भाईंदर येथून रात्री साडेअकराच्या सुमारास गावी देवरूख येथे जाण्यास निघाले होते. आपल्या ताब्यातील किया कारने हे कुटुंब निघालं होतं. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भरणे नाका येथे आल्यावर जगबुडी नदीवरील असलेल्या मोठ्या ब्रिज वरून कार थेट नदीत कोसळली. ही भीषण दुर्दैवी घटना पहाटे पाच ते साडेपाच सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमधून जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात तातडीने हलवण्यात आलं मात्र या अपघातातील पाच जणांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय हालवण्यात आले आहे तर विवेक मोरे हे गंभीरित्या जखमी झाले आहेत. त्यांनाही खेड येथून पुढील उपचार करता हलवण्यात आल आहे. किया कार (क्रमांक MH 02 3265) ही कार घेऊन मुंबई मिरा रोड इथून गावी निघाले होते. येथील पराडकर कुटुंबीय नालासोपारा परिसरात राहणारे आहेत तर मोरे मीरा-भाईंदर येथील आहेत.
घटनास्थळी मदतीकरता खेड येथील माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह नागरिक, पोलिसांनी व महामार्ग पोलिसांनी धाव घेतली होती तातडीने कार मध्ये अडकलेल्या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं त्यानंतर क्रेनच्या मदतीने ही कार बाहेर काढण्यात आली. या सगळ्या अपघाताची नोंद करण्याची कार्यवाही खेड पोलिसांकडून सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 19-05-2025














