संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील आरवली-माखजन रस्ता ते भुवडवाडी येथील काम पूर्ण झाले असून आमदार शेखर निकम यांच्या सहकायनि हे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
माखजन मुख्य रस्ता ते प्रकाश तानु यांच्या घरापर्यंतच्या रस्त्याची लांबी ६५० मीटर आहे. हा रस्ता व्हावा यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी आमदार निकम यांना साकडे घातले होते. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य नाना कांगणे वाडीतील ग्रामस्थ दत्ताराम भुवड, सीताराम भुवड, सोमा घोटेकर, प्रकाश भुवड, सिताराम पांडुरंग भुवड, सुरेश जानू भुवड, हिरु घाणेकर, मिलिंद भुवड आदी लोकांचे सहकार्य लाभले आहे. रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करण्यात आले असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:21 AM 19/May/2025












