लांजा : तालुक्यातील रुण गावातील अरविंद कृष्णा चंदुरकर यांनी सामाजिक जाणीव, जागृती आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने आपली आई (कै.) सौ. राधिका कृष्णा चंदुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वखर्चाने आठ लाख रुपये खर्च करून स्मशान शेड उभारली आहे.
अरविंद चंदूरकर आणि त्यांचे बंधू दीपक चंदूरकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचे नेहमीच गावच्या सर्व उपक्रमांत योगदान असते. त्याच भावनेतून त्यांनी जवळपास आठ लाख रुपये खर्च करून सुसज्ज अशी स्मशान शेड उभारली आहे. या स्मशान शेड इमारतीचा लोकार्पण सोहळा कृष्णा चंदूरकर यांच्या हस्ते व अरविंद चंदूरकर, दीपक चंदुरकर आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत झाला. गावप्रमुख दत्ताराम सरवंदे, सर्व गावकर, वाडीप्रमुख, रुण ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष, ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामविकास मंडळ आणि ग्रामपंचायतीतर्फे चंदूरकर कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. ही वास्तू उभारण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या महेश जाधव आणि सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 19/May/2025














