दापोली : शहरात पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. शनिवार ऑणि रविवारी सुटी असल्याने सुट्यांचा आनंद घेण्य घेण्यासाठी अनेक पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
शाळांना सुट्या पडल्याने पर्यटकांनी दापोलीची वाट धरली आहे. समुद्रकिनारे, निसर्गरम्य स्थळे आणि थंड हवा यामुळे दापोली नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. आज अचानक मोठ्या संख्येने पर्यटक आल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक आणि समुद्र किनाऱ्याकडे जाणारे रस्ते पूर्णपणे ब्लॉक झाले आहेत. अनेक पर्यटक दीर्घकाळ वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटक दोघांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सुट्यांचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक आणि वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेले नागरिक, असे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किमान रहदारीच्या मार्गावर तरी वाहतूक पोलिसांची नेमणूक करून वाहतूक सुरळीत करावी, अशी अपेक्षा पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
शाळांना पडलेल्या सुट्या, सलग लागून आलेला शनिवार, रविवार यामुळे पर्यटकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. केळसकर नाक्यावर वाहतूक कोंडीमुळे पर्यटक अडकतात. याचा स्थानिकांही फटका बसतो. त्यामुळे संबंधित यंत्रणेने यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे- महेश महाडिक, नागरिक, दापोली
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 19/May/2025














