लांजा : तालुक्यातील कुवे येथे पार पडलेल्या जाकडी नृत्य स्पर्धेत विठ्ठल रखुमाई नाच मंडळ गवाणे गवळीवाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजाच्या (कार्यक्षेत्र लांजा राजापूर रत्नागिरी) वतीने ४० वर्षावरील भव्य जाकडी नृत्य स्पर्धा रासाई देवी मंदिर कुवे येथे उत्साहात पार पडल्या. जुनी पारंपारिक लोककला जाकडी नृत्य सादर करण्याची संधी या निमित्ताने ज्येष्ठ कलाकारांना मंडळाने उपलब्ध करून दिली होती.
स्पर्धेचे उद्घाटन कलगी तुरा उन्नती समाज मंडळ समन्वय समिती अध्यक्ष अभय सहस्रबुद्धे, मोहन घडशी, कुवे गावचे सर्व गावकरी व मानकरी, कलगीतुरा उन्नती समाज मंडळ अध्यक्ष चंद्रकांत पालकर, उपाध्यक्ष विष्णू धाडवे, सचिव रविंद्र कोटकर, सहसचिव चंद्रकांत गुरव, खजिनदार संदीप सावंत, सदस्य देवजी हरमले, दिलीप आग्रे, संदीप सोबण, शशिकांत कानागळ, कु. अमोल शिंदे तसेच सल्लागार समिती सदस्य आत्माराम धुमक, सुभाष रामाणे, चंद्रकांत जड्यार, मारुती गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:06 PM 11/Oct/2024














