राजापूर : गंगातीर्थ येथे अंघोळीसाठी गेलेल्या वृद्धाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

राजापूर : तालुक्यातील उन्हाळे मोंडेवाडी येथील ७५ वर्षीय वृद्धाचा अंघोळीसाठी गेलेल्या ठिकाणी चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. सहदेव धकटु गुरव असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात १६ मे रोजी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहदेव गुरव हे १६ मे रोजी दुपारी ३.०० वाजता उन्हाळे येथील गंगातीर्थ येथे अंघोळीसाठी गेले होते. तेथे काशी कुंडात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते पाण्यात पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी राजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. राजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 19/May/2025