‘महावितरण’कडून सौर पंप

रत्नागिरी : शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा सहज व सुलभ उपलब्ध व्हावी यासाठी महावितरणतर्फे मागेल त्याला सौर कृषीपंप योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी शेतकरी घरबसल्या आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.

या योजनेसाठी २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्वशक्ती क्षमतेपर्यंतचा सौर कृषीपंप २.५१ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्वशक्ती क्षमतेचा आणि नऊ एकरवरील शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप दिला जाणार आहे तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास ती ग्राह्य धरण्यात येणार आहे. वैयक्तीक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणाऱ्या नदीच्या शेजारी शेतजमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत आहे व ज्या शेतसिंचनासाठी पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना राबवण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:14 11-10-2024