लखनौ : IPL 2025 : लखनौ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं विजय मिळवत पराभवाची मालिका थांबवली. अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी करुन हैदराबादच्या विजयाचा पाया रचला.
लखनौ सुपर जायंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 बाद 205 धावा केल्या होत्या. हैदराबादनं 19 ओव्हरमध्येच ही धावसंख्या पूर्ण केली. हैदराबादसाठी अभिषेक शर्मानं अर्धशतक केलं.
लखनौच्या एकना स्टेडियममध्ये हैदराबादला विजयासाठी 206 धावांची आवश्यकता होती. हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. अथर्व तावडे 13 धावा करुन बाद झाला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या 82 धावांच्या भागीदारीमुळं हैदराबादनं कमबॅक केलं. अभिषेक शर्मानं 59 धावा केल्या तर ईशान किशन 35 धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लान आणि कामिंदू मेंडिसनं 55 धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवलं.
लखनौला यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. यामुळं लखनौ सुपर जायंटस प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर पडलं आहे. आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा असेल. प्लेऑफमध्ये यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दाखल झाले आहेत.
लखनौचं कुठं चुकलं?
सनरायजर्स हैदराबादनं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौनं 7 बाद 105 धावा केल्या. लखनौचे सलामीवीर मिशेल मार्शनं 39 बॉलमध्ये 65 धावा केल्या. मार्श आणि मार्करम यांच्यात पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी झाली. मात्र, लखनौला या चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. रिषभ पंत 6 धावा करुन बाद झाला. मार्करम यानं 61 धावा केल्या. आयुषनं 3 धावा केल्या. निकोलस पूरननं 26 बॉलमध्ये 45 धावा केल्या. निकोलस पूरन यानं आयुष बदोनी आणि अब्दुल समद याच्यासोबत चांगली भागीदारी केली.
मात्र, सनरायजर्स हैदराबादनं अखेरच्या दोन ओव्हरमध्ये दमदार कमबॅक केलं. लखनौनं शेवटच्या दोन ओव्हरमध्ये चार विकेट गमावल्या. आकाशदीपनं शेवटच्या बॉलवर षटकार मारला त्यामुळं लखनौनं 200 धावांचा टप्पा पार केला. लखनौनं 7 बाद 205 धावा केल्या.
206 धावांचं आव्हान स्वीकारत सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनी डावाची सुरुवात केली. मात्र, अथर्व तावडे 13 धावा करुन बाद झाला. अभिषेक शर्मा 20 बॉलमध्ये 59 धावा करुन बाद झाला. ईशान किशननं 35 धावा केल्या. हेनिक क्लासेननं 47 धावा केल्या. या फलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादनं 6 विकेटनं विजय मिळवला.
लखनौनं पहिल्या पाच ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. मात्र, रवि बिश्नोईच्या एका ओव्हरमध्ये अभिषेक शर्मानं चार षटकार मारले. तिथून लखनौची मॅचवरील पकड संपली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 20-05-2025














