आजचे राशीभविष्य, २० मे २०२५ 

मेष – आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे.

वृषभ – आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल.

मिथुन – आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल.

कर्क – आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील.

सिंह – आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे.

कन्या – वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील.

तूळ – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक – आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल.

धनु – आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील.

मकर – आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल.

कुंभ – आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल.

मीन – आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 20-05-2025