राजापूर : शहरातील धोपेश्वरघाटी येथील श्री धूतपापेश्वर युवक मंडळाच्या माध्यमातून शहरातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये श्रमदानातून स्वच्छतामोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत वैकुंठ स्मशानभूमीतील शवदाहिनी व परिसरातील कचरा, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. त्यानंतर स्मशानभूमीचे रूपडेच पालटून गेले.

शहरातील आंबेवाडी परिसरात वैकुंठ स्मशानभूमी असून, या ठिकाणी परिसरातील झाडीझुडपांमुळे मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. शवदाहिनी व अन्य इमारतींवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. त्यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. शहरातील धोपेश्वरघाटी येथील श्री धूतपापेश्वर युवक मंडळाने रविवारी या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. स्मशानभूमी परिसरातील शवदाहिनीतील राख, पालापाचोळा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. सरणासाठी लागणारी लाकडे योग्य पध्दतीने तोडून ती व्यवस्थित रचून ठेवण्यात आली. पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत ही मोहीम राबवण्यात आली.
धूतपापश्वर युवक मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र कविकर, उपाध्यक्ष सुनील विर्ज यांच्या नेतृत्त्वाखाली सतीश तांबे, संजय बोटले, प्रवीण बोटले, सुरेंद्र तांबे, संतोष चव्हाण, रवींद्र बावधनकर, कुंदन शिंदे, सहदेव पारकर, अविनाश रत्न तांबे, प्रशांत मांजरेकर, विनोद तांबे, रक्षित साखरकर, पंकज बावधनकर, मंगेश, महेश बाकाळकर, अण्णा तांबे, केतन तांबे, राजीव साखरकर, रमेश रहाटे, तेजस कांबळे, शौर्य बावधनकर अशी वाडीतील तरुण मंडळी व प्रौढ मंडळी या मोहिमेत सहभागी झाली होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 20/May/2025














