निवखोल शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज निवखोल येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे फित कापून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, राहुल पंडित, बिपीन बंदरकर, सुदेश मयेकर, राजन शेट्ये, सुहेल मुकाद, दिशा साळवी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

चांगली आरोग्य व्यवस्था असावी असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पंधराव्या वित्त आयोगातून नागरिकांसाठी चांगल्या पध्दतीची आरोग्य व्यवस्था केली जात आहे. नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी या केंद्राचा निश्चितच उपयोग होणार आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला धन्वंतरी प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 11-10-2024