आजचे राशीभविष्य, २१ मे २०२५

मेष – आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल.

वृषभ – आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मिथुन – मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील.

कर्क – आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील.

सिंह – आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे.

कन्या – आज नोकरी – व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्‍यांचे सहकार्य वाढेल.

तूळ – आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील.

वृश्चिक – आज मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील.

धनु – आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

मकर – कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल.

कुंभ -आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल.

मीन – स्थावर संपत्ती व कोर्ट – कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 21-05-2025