Ladki Bahin Yojana: रत्नागिरी जिल्ह्यात ‘लाडकी बहीण’ची बनावट खाती किती? जाणून घ्या एका क्लिकवर…

रत्नागिरी : Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १०० हून अधिक बनावट खाती उघडण्यात आल्याचे मुंबईत समोर आले होते.

त्यानंतर अशा बनावट खात्यांसंदर्भात पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली होती; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात एकही बनावट खाते आढळून आले नसल्याचे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून सांगण्यात आले. तसेच नव्या निकषानुसार ७ हजार ७५३ महिलांचा लाभ आता बंद करण्यात आला आहे. ( Ladki Bahin Yojana )

लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात महिला आणि बालविकास विभागाकडून वेगवान प्रयत्न केले गेले. प्रत्येक लाभार्थी महिलेपर्यंत योजना पोहोचावी यासाठी या विभागाच्या अंगणवाडी सेविकांनी युद्धपातळीवर कामगिरी बजावली. जिल्ह्यात तब्बल ४ लाख २१ हजार १३३ महिलांचे अर्ज भरण्यात आले होते. या सर्व महिलांना जुलै २०२४ पासून १ हजार ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली; मात्र मुंबईमध्ये काही बनावट लाभार्थी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातच प्रत्येक लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात एकही बनावट लाभार्थी नसल्याचे समोर आले आहे; मात्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या महिलांच्या नावावर चारचाकी वाहन आहे अशा महिलांना या योजनेतून वगळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी प्रादेशिक परिवहन विभागाकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार पडताळणी करण्यात आली. यादीनुसार हजारो महिलांना या यादीतून वगळण्यात आले असल्याचे समोर आले आहे. ( Ladki Bahin Yojana )

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 21-05-2025