रत्नागिरी : बाह्ययंत्रणेद्वारे माजी सैनिक संवर्गातून विशेष निधीतून अशासकीय कर्मचारी भरती करण्यात येत असून, इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 10 जूनपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलांचे/मुलींचे वसतिगृह, चिपळूण व विश्रामगृह, चिपळूण, माजी सैनिक विश्रामगृह, खेड व दापोली व सैनिकी मुलांचे वसतिगृह, देवरूख येथे सहायक वसतिगृह अधीक्षक, सहायक वसतिगृह अधीक्षिका प्रत्येकी 1 पद, पहारेकरी 5 पदे, माळी 3 पदे, स्वयंपाकी 4 पदे आणि सफाई कामगार 2 ही अशासकीय पदे भरण्यात येणार आहेत.
ही पदे कंत्राटी या बाह्ययंत्रणेद्वारे माजी सैनिक या संवर्गातून विशेष निधीतून अशासकीय स्वरूपात भरायची आहेत. त्यासाठी माजी सैनिक असणे गरजेचे आहे. माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास माजी सैनिक विधवा व माजी सैनिक किंवा माजी सैनिक विधवा उपलब्ध न झाल्यास इतर म्हणजेच नागरी संवर्गातून ही पदे भरली जाणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 21-05-2025














